फौजदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवत ठेवले बळजबरीने शरीरसंबंध अन् तिला अंधारात ठेवून धुमधडाक्यात लग्न दुसरीशी केलं.

Spread the love

बारामती :- तालुक्यातील बाबुर्डी परिसरातील.. वस्तीगृहाच्या निमित्ताने पीडित तरुणीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केलेल्या प्रेमवीराने लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने शरीरसंबंध तर प्रस्थापित केले, पण तिला अंधारात ठेवून लग्नगाठ दुसरीशीच बांधली. तरुणीने न्यायासाठी दाद मागितली, पण कुटुंबीयांनी खालच्या जातीतील म्हणून बाहेरचा रस्ता दाखवला आणि अखेर बारामती तालुका पोलीस ठाण्यात बलात्कार, ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फौजदारासह संपूर्ण कुटुंब लग्नाच्या बेडी ऐवजी कायद्याच्या बेडीत अडकलं.!

या संदर्भात पोलीस सूत्रांकडे माहिती अशी की, बाबुर्डी येथील यश नवनाथ खोमणे यांच्यासह त्याची आई मनीषा नवनाथ खोमणे, नवनाथ खोमणे, चुलता शेखर खोमणे व यश खोमणे याचा मामा अशा पाच जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भातील थोडक्यात हकीकत अशी, यश खोमणे याने बाबुर्डी येथील वसतीगृहाच्या कामकाजाच्या निमित्ताने पीडित तरुणीशी ओळख वाढवली व व्हाट्सअपवर चॅटिंग करत प्रेमसंबंध प्रस्थापित केले.

यानंतर संबंधित पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत त्याने आपल्या जाळ्यात ओढले आणि तिची इच्छा नसतानाही बळजबरीने बारामतीतील विविध ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या दरम्यान या तरुणीने लग्नाची विचारणा केल्यानंतर यश खोमणेच्या कुटुंबीयांनी वेगळ्या जातीतील असल्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर संबंधित तरुणीने आपल्या घरी प्रकार सांगितला. यानंतर पुन्हा यश खोमणे याने चर्चेचे निमित्त काढत संबंधित तरुणीला अंधारात ठेवले आणि 2 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्याच मुलीशी धुमधडाक्यात लग्न केले.

या लग्नाची माहिती होताच संबंधित तरुणीने आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यावर दाद मागण्याची तयारी दाखवताच खोमणे याच्या नातेवाईकांनी चर्चेचे निमित्त काढले व चर्चेसाठी बोलावले. मात्र तेथे या कुटुंबीयांनी वाद केल्याने अखेर पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकांनी बारामती तालुका पोलीस ठाणे गाठून तिथे गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा

टीम झुंजार