नाशिक:-मधून मोठी बातमी समोर आली आहे. विवाहितेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आपल्या दोन मुलांसह जीवन संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवडमध्ये घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकुल्यासह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिंडोरीच्या खतवड येथे घडली आहे. अश्विनी मुळाने असे या विवाहितेचे नाव असून तिने 9 वर्षाचा सिद्धेश मुळाणे आणि सहा वर्षांचा विराज मुळाणे या मुलांनासोबत घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता, या जाचाला कंटाळून तिने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






