पोलीस हवालदार राजेश पाटील यांचा पोलिस महासंचालक पदकाने गौरव

Spread the love

एरंडोल : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल १ मे रोजी येथील हवालदार राजेश पंडित पाटील यांचा जळगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.

पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सपोनि गणेश अहिरे, शरद बागल यांच्या हस्ते राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल पाटील, मिलिंद कुमावत, अकील मुजावर, पंकज पाटील, किरण पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार