परीक्षांच्या श्रेणींसाठी ऑनलाइन शिकवताना शिक्षकाने लावला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थीनी केला संस्थेविरुध्द गुन्हा दाखल

Spread the love

श्रीनगर :- फिजिक्स वल्ला ही संस्था भारतातील ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना IIT JEE परीक्षा, NEET परीक्षा, सरकारी नोकरी परिक्षा, CA परीक्षा, संरक्षण या परीक्षांच्या श्रेणींसाठी शिक्षण दिले जाते. या संस्थेविरोधात काश्मीरच्या एका विद्यार्थीनीने फिजिक्स वल्लाच्या श्रीनगर शाखेविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यात असे सांगितले आहे की, विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांने अश्लील चित्रीकरण व्हिडिओतून दाखवले आहे. शिक्षणाच्या वातावरणात मनोरंजन महत्त्वाचे आहे का? असा प्रश्न विद्यार्थींनी विचारला आहे. शिक्षणाच्या नावाखाली ‘अश्लील दृश्ये’ प्रदर्शित करत आहे. यावर बंदी घालू नये का ? असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांनी उचलला आहे. या व्हिडिओवर संतापलेल्या नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. एकाने लिहले आहे की, हे मुद्दाम लावण्यात आले आहे. एकाने लिहले आहे की, शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

या प्रकरणानंतर अद्याप कोणतेही अधिकृत माहिती संस्थेकडून आली नाही. ऑनलाईन शिकवताना शिक्षकाने यांनी 2017 च्या ‘राबता’ चित्रपटातील ‘इक वारी आ’ या गाण्याच्या मॅशअपचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन एका इंटिमेट सीनमध्ये दिसत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार