एरंडोल :- तालुक्यातील कासोदा येथील पोलीस स्टेशन परिसर तसेच जिल्ह्यात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजू व्यक्तींना घेऊन त्यांच्याशी मध्यस्थ्यानमार्फत संपर्क करून लग्नासाठी मुली दाखविले जातात नंतर दोन ते पाच लाख रुपये पर्यंत पैसे घेऊन त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या मुलींशी लग्न लावून दिले जाते सदर मुली लग्नानंतर काही दिवस चांगला संसार करतात व विश्वास संपादन करून घरातून पैसे सोने चोरून पळून जातात अशी टोळी(रॅकेट) जिल्ह्यात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून सदर प्रकार उघडकीस आणून कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी याने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील महिला आरोपी मोना दादाराव शेंडे वय २५, सरस्वती सोनू मगराज वय २८, मोना दादाराव शेंडे वय २८, दोन्ही राहणार रायपूर राज्य छत्तीसगड, अश्विनी अरुण थोरात वय २६, राहणार पांढुर्णा (मध्य प्रदेश), अशा तिघींचे कासोदा गावातील तीन तरुणांसोबत आ. क्र.४ सरलाबाई अनिल पाटील वय ६०, उषाबाई गोपाल विसपुते वय ५०, दोन्ही राहणार नांदेड तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यांनी दिनांक 16 4 2024 रोजी लग्न लावून दिले होते यातील एका आरोपीने कबूल केले की आम्ही तिघींचे यापूर्वी लग्न झालेले असून आम्हाला मुले आहेत व आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करण्यासाठी घरून महाराष्ट्रात आलेलो आहोत
फिर्यादी व त्यांचे दोन्ही साथीदार अशांना एजंट महिला आरोपी सरलाबाई अनिल पाटील उषाबाई गोपाल विसपुते दोघे राहणार नांदेड तालुका धरणगाव यांनी उपवर मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी लग्न लावून देण्याचे आम्हीच दाखवून वेळोवेळी संपर्क करून खोटे सांगून लग्नासाठी उपवर किती मुलांच्या घरांच्या कडून एकत्रित ४१३००० उकडले वरील आरोपी क्रमांक एक ते तीन यांचे यापूर्वी लग्न झालेले असून सुद्धा त्यांनी ती माहिती लपवून त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणूक केली.
सदर आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी पोलीसाधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवाणसिंग राजपूत, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, सहाय्यक फौजदार मनोज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश खोंड पोलीस नाईक किरण गाडीलोहार , पोलीस कॉन्स्टेबल इम्रान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल जितेंश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता पाटील अशा पथकाने सदर कारवाई केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.