पुणे : पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्यानं पत्नीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना पुण्यात घडलीय. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे दाम्पत्यामध्ये सतत वाद होत असतं. पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ केला जात असल्याच्या कारणाने त्रासलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. मोनिका मधुकर ओव्हाळ असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यात येरवडा परिसरात मोनिका आणि तिचा पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ राहत होते. मोनिकाने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
या प्रकरणी तिचा भाऊ प्रशांत सुरेश चाबुकस्वार याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पती मधुकर ओव्हाळ याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.मधुकर ओव्हाळ याच्याशी लग्न झाल्यानंतर मोनिका तिच्या सासरी राहत होती. तेव्हा पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं. यामुळे मोनिका आणि मधुकर ओव्हाळ यांच्यात सतत वाद होऊ लागले. वादातूनच मधुकर मोनिकाला त्रास देत असल्याचं तिच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पती सतत त्रास देत असल्याने महिलेने घरी गळफास घेत जीवन संपवलं. आता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
मुंबईत पतीने पत्नीची केली हत्या
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दारावे गावात घडली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर आरोपीची चौकशीही करण्यात आली.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.