हैवान पत्नीचे भयानक कृत्य! पतीला दिल गुंगीचे औषध दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा केला प्रयत्न.

Spread the love

Viral Video:बिजनौर :- सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला आपल्या पतीवर अत्यचार करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बिजनौरचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबध होते. मात्र, पतीने विरोध केल्यानंतर महिलेने धक्कादायक पाऊल उचलले. @Officer165578 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीला दूधातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे दोन्ही हात बांधले. तसेच त्याच्या छातीवर चढून त्याला मारहाण केली. सिगारेटने अनेक ठिकाणी चटके दिले. चाकूने प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. पत्नी मेहर जहाँला अटक करण्यात आली आहे.

दोघांच लव-मॅरेज होतं

युवकाने सांगितलं की, लग्ना आधीपासून मी पत्नीला ओळखत होतो. आमच्यात बोलणं सुरु झालं, त्यानंतर प्रेम झालं. कुटुंबाच्या समतीने 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुस्लिम पद्धतीने लग्न झालं. युवकाच्या वडिलांच म्हणण आहे की, पत्नीच्या मनात येतं, तेव्हा ती मारहाण करते. बेडरुममध्ये क्रूर वागणूक देते. हे सर्वांसमोर यावं म्हणून युवकाने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.

त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं

पतीने जे सांगितलय त्यानुसार, 29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. त्याचे हात-पाय बांधले व त्याच्या प्रायवेट पार्टला सिगारेटचे चटके देत होती. इतकच नाही, हातात चाकू घेऊन त्याला जखमी केलं. या दरम्यान पत्नी सिगारेट ओढत होती.

“पत्नीकडून पतीचा छळ

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलेने पतीचे दोन्ही हात स्कार्फने बांधल्याचे दिसत आहेत. त्यानंतर ती त्याच्या छातीवर बसून त्याला मारहाण करते. यानंतर महिला सिगारेट ओढताना दिसते. यावेळी ती पतीला अनेकदा सिगारेटचे चटके देते. त्यानंतर ती हातात चाकू घेऊन पतीचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न करते.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात कारवाई करत तिला अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. व्हिडिओ आणि चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार