Viral Video: आई आणि मुलांचं नातं हे सर्वात वेगळं आणि आपुलकीचं मानलं जातं. निस्वार्थी प्रेम म्हणून या नात्याकडे पाहिले जाते. मुलांना काही दुखलं खुपलं तरी सर्वात आधी धावत येणारी आई असते. अडचणीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवणारी आई असते.पोटच्या मुलांसाठी ती कोणताही धोका पत्करायला तयार असते. पण, रागाच्या भरात ही आई आपल्या मुलीच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक निर्दयी आई आपल्या पोटच्या मुलीला इतक्या अमानुषपणे मारहाण करते की पाहताना आपला जीव कळवतोय. आईने आधी पलीत्याने चोपले, तिचा गळा पकडून आवळला; यामुळे चिमुकली रडत ओरडत होती, तरी निर्दयी आईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही.
या घटनेचा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.ही संतापजनक घटना पाहून तु्म्हालाही प्रश्न पडला असेल की इतकी निर्दयी आई असू शकते का? पण, प्रत्यक्षात असे घडलेय.लहान मुलं मस्ती करतात म्हणून आई-वडील त्यांना ओरडतात, शिक्षा करतात किंवा वेळप्रसंगी दोन फटके लगावून देतात. पण, तरीही काही मुलं पालकांचे ऐकत नाहीत; ते इतकी मस्ती करतात की, पालकही त्यांना कंटाळतात. अशावेळी रागााच्या भरात काही पालक मुलांना इतक्या अमानुष पद्धतीने मारतात की पाहताना आपला जीव कळवळतो, त्यातलीच ही घटना आहे.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई आपल्या मुलीला अतिशय क्रूरपणे मारहाण करत आहे. ही निर्दयी आई मुलीचा गळा पकडून पलीत्याने हाता- पायांवर जोरजोरात फटके देते.
यानंतर तिचा टीशर्ट पकडून फरपटत नेत फरशीवर बसवते. यावेळी ती मुलगी बेंबीच्या देठापासून ओरडत, रडत असते. पण, ती निर्दयी आई काही थांबत नाही. धक्कादायक म्हणजे ती आई मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते. एकदा नाही तर दोनदा ती गळा दाबून चिमुकलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. यानंतर हाताला पकडून फरपटत तिला दुसऱ्या खोलीत घेऊन जाते. या घटनेवेळी ती असहाय्य लहान मुलगी मदतीसाठी जीव तोडून ओरडते, रडते मात्र तरीही ती दगड काळजाची आई तिला मारहाण करत राहते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही आई आहे की कसाई, अशी प्रतिक्रिय दिली आहे.एवढी पाषाणहृदयी आई कशी असू शकते, म्हणत अनेक जण ही घटना पाहून स्तब्ध झाले आहेत. या घटनेत त्या आरोपी आईने एवढ्या क्रूर आणि निर्दयी रीतीने चिमुरडीला मारले की, पाहताना कुणाच्याही काळजात धस्स होईल.
ही घटना गुजरातमधील असल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक म्हणजे आई मुलीला निर्दयीपणे मारहाण करत असताना वडील त्याचा व्हिडीओ शूट करत होते, असाही दावा काहींनी केला आहे.हा व्हिडीओ पाहून आता सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपी आईवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हा व्हिडीओ कोण रेकॉर्ड करत होतं? व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने ही मारहाण थांबवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ मुलीच्या वडिलांनीच रेकॉर्ड केला होता का आणि जर असे असेल तर दोन्ही पालकांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही नेटिझन्सनी केली आहे.
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.