पुणे :- चारित्र्याच्या संशयावर एका विवाहितेच्या गुप्तांगाला कुलूप लावण्याची घटना ताजी असतांना, आता दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन ड्रग्स आणि दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकिस आली आहे.ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भिकेन दौड (वय २९, रा. सातकरस्थळ, ता. खेड), श्रीराम संतोष होले, (वय २३, रा. होलेवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दोन अल्पवयीन पीडितांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका डोंगरावर घेऊन गेले. यावेळी त्यांनी किरण नामक तिसऱ्या आरोपीकडून ड्रग्स घेतले. दोघींना ड्रग्सचे इंजेक्शन आणि दारू पिण्याचा आग्रहत्यांनी धरला. त्यांनी नकार दिला असता तुम्हाला इथेच सोडून जाऊ अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर त्यांना इंजेक्शनच्या साह्याने आधी ड्रग्स देऊन आणि नंतर त्यांना दारू पाजली.
दोघीही नशेत असतांना आरोपींनी त्यांना लॉजवर लेले. त्या ठिकाणी त्यांनी दोघींवर बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुली या घरी नशेतअसलेल्या अवस्थेत पोहचल्यावर घरच्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांची चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मुलींच्या पालकांनी या प्रकरणी राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. राजगुरुनगर पोलीसांकडून दोघांना अटक केली असून ड्रग्स देणारा तिसरा आरोपी फरार आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले