जामनेर :- अनेक महिलांची आपल्या मुलानं आपल्या भावाची मुलगी घरात सून म्हणून आणावी, अशी इच्छा असते. परंतु जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून एक अजब घटना समोर आलीय. भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाचं घर गाठलं.मुलगी पसंत पडल्याने मोठ्या मुलाने होकार दिला; पण इतक्यात लहान मुलानेही मुलगी पसंत असल्याचे सांगत चक्क तिच्यासोबतच लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारलं. मात्र, सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नंतर आला. भावांची भांडणं पाहून मामाच्या मुलीनेही आपले पत्ते उघडले. तिने सांगितलं की तिचं गल्लीतील दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे. बाहेरच्या राज्यातील रहिवासी असलेली बहीण जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली. इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला.
यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला.दोन्ही भावांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मोठ्या भावाने लहान्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई केली. फाटलेल्या कपड्यांतच त्याने जामनेर पोलिस स्टेशन गाठले, त्याची समजूत काढत घरी आणले.इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांनाच धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे रवाना झाली.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.