लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाबाबत अनेक स्वप्न रंगवतो. नवरी आणि नवरदेव दोघंही अतिशय आनंदात असतात. मात्र, काहीवेळा हा आनंद दुःखातही बदलतो.असंच काहीसं एका नवरदेवासोबत झालं. या नवरदेवाने स्टेजवर सर्वांसमोरच वधूला किस केल्यानं एकच गोंधळ उडाला.ही घटना उत्तर प्रदेशातील हापूर येथून समोर आली आहे. यात नवरदेवाने नवरीला स्टेजवर किस करताच दोन्ही बाजूकडील लोकांमध्ये काठीने हाणामारी झाली.
या मारामारीत 6 जण जखमी झाले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. शेवटी लग्नाची वरात वधूशिवाय परतली. मात्र, मारहाण करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.प्रकरण अशोकनगर परिसरातील आहे. मोहल्ला अशोक नगर येथील एका व्यक्तीने सांगितलं की, सोमवारी रात्री त्याच्या दोन मुलींचं लग्न होतं. मोठ्या मुलीच्या लग्नाची वरात सुभाषनगर येथून तर लहान मुलीच्या लग्नाची वरात शिवनगर येथून आली होती. मोठ्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.
यानंतर धाकट्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. वरमाळे दरम्यान, वराने वधूला किस केलं. यावर वधूपक्षाचे लोक संतापले.यावरून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. वरालाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात पप्पू, पंकज, नरेश, रवी, पवन, अंकित हे जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 7 जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं.
या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.किसवरून वाद झाल्यानंतर लग्नाची वरात वधूशिवाय परतली. नंतर दोन्ही बाजूचे लोक यावरून निराश झाले. मंगळवारी सकाळी वराच्या बाजूचे लोक वधूच्या घरी पोहोचले. जिथे त्यांनी आपली चूक मान्य करत वधूला आपल्यासोबत पाठवण्याची विनंती केली. सकाळपासून सायंकाळपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये यावरुन वाद सुरू होता, मात्र कोणताही निकाल लागला नाही. वराने वधूचे चुंबन घेतल्याने झालेल्या वादामुळे केवळ मुलीच्याच नव्हे तर परिसरातील रहिवाशांमध्येही निराशा पसरली होती. हे लग्न परिसरात चर्चेचा विषय ठरलं आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.