श्रीगोंदा :- तालुक्यातील बेलवंडी येथील एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एका महिला डॉक्टरनं परिचारिकेला घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित परिचारिकेनं थेट पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एका महिला डॉक्टरनं परिचालिकेला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिला डॉक्टरनं परिचारिकेला घरात घुसून लोखंडी गजानं मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
डॉ. माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी जाऊन “तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?”, अशी विचारणा केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी गजानं परिचारिकेला मारहाण केली. एवढंच नाहीतर “माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मी कशाला मॅसेज करू”, असं परिचारिकेनं महिला डॉक्टरला सांगितलं. मात्र, तरीही डॉ. माधुरी जगताप काही थांबल्या नाहीत. त्यांनी हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून परिचारिकेला मारहाण सुरूच ठेवली. याप्रकरणी परिचारिकेनं महिला डॉक्टरविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हाही दाखल केला आहे.
पीडित परिचारिकेनं फिर्यादीत सांगितल्यानुसार, महिला डॉक्टरनं लोखंडी गजानं जबर मारहाण केलीच, पण त्यासोबतच “पुन्हा जर नादी लागली तर फाशी देऊन मारीन… गावात राहिली तर सुपारी देऊन मारून टाकीन… कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही…”, अशा धमक्याही वारंवार परिचारिकेला दिल्या आहेत. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.