जम्मू :- आज एकीकडे राजधानी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला बेछुट गोळीबार केला.यानंतर बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून, 30-35 जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे.
अपघातात जखमी झालेल्या अनेक भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधात शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात घडली आहे. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते.
बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला.दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे घाबरलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. बसमध्ये जवळपास 50 भाविक असल्याची माहिती मिळत आहे. ज्या दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला, ते सर्व राजौरी, पूंछ आणि रियासी भागात लपून बसले असून, सुरक्षा दलाने त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
भाविक उत्तर प्रदेशचे रहिवासी
या दहशतवादी घटनेबाबत एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शिवखोडीहून कटरा येथे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला केला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या घटनेत आतापर्यंत दहा भाविकांचा मृत्यू झाला असून 32 भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांना रियासी येथील नारायणा हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.
ओमर अब्दुल्लांनी केला हल्ल्याचा निषेध
जेकेएनसीचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, अशा हिंसक घटनांमुळे या प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यांनी या आव्हानात्मक काळात सर्व समुदायांनी एकत्र येण्याचे आणि सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या दु:खद प्रसंगी आपल्या संवेदना व्यक्त करून, त्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त केल्या.दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अखनूरमधील रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
हे पण वाचा
- किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाने लग्नासाठी बनला बनावट आयपीएस अधिकारी, साखरपुडाही केला, पण अशी झाली पोलखोल.
- अमळनेर तालुक्यात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादात तरुणाच्या केला खून;तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच केली अटक.
- “गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक : अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात भेट”
- जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.