लखनऊ :- उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका उद्योजकाच्या घरातील नोकराने मालकाच्याच मुलीवर ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नोकराने घरातील बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून मुलीचे आंघोळ करतानाचे आपत्तीजनक व्हिडीओ शूट केले होते.नंतर याच व्हिडीओंच्या आधारे त्याने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोर्टात हजर केल्यानंतर त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. वेल्डिंग व्यावसायिकाने दानिश नावाच्या तरुणाला नोकरीवर ठेवलं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवत व्यावसायिकाने त्याला आपल्या घरातील एक रुमही राहण्यासाठी दिली होती. पण त्याची आपल्या मुलीवर वाईट नजर असल्याची उद्योजकाला कल्पना नव्हती. यानंतर त्याने वाईट हेतून बाथरुममध्ये एक छुपा कॅमेरा लावला. यावेळी त्याने मुलीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट केले. नंतर हेच व्हिडीओ त्याने मुलीला दाखवले असता तिला धक्का बसला. या व्हिडीओंच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करत बलात्कार करण्यास सुरुवात केली.
पोलिसांकडून मुलीचं समुपदेशन केलं जात आहे. या सर्व प्रकारामुळे मुलगी तणावग्रस्त झाली होती. तिची प्रकृतीही बिघडू लागली होती. अखेर तिने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी दानिशला जाब विचारत व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. पण याउलट दानिशने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसंच जर पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलीच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेशला अटक केली. एसएचओ ब्रिजेश चंद्र तिवारी यांनी सांगितले की, दानिशविरुद्ध आयपीसीच्या कलम 376, 66, आयटी कायदा 384 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.