Viral Video: लग्न हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे प्रत्येक जोडपे आपले लग्न खास पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. कित्येक जोडपे डेस्टिनेशन वेडिंग करतात.काही जोडपे लग्नाच्या वेळी अशी एन्ट्री करतात जी कायम सर्वांच्या लक्षात राहील. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरा नवरीने चक्क स्वत:ला पेटवून घेत लग्नात एन्ट्री केली आहे. पेटत्या आगीच्या ज्वालांसह जोडप्याची थरारक एन्ट्री पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
चित्रपटांमध्ये किवा रिअॅलटी शोमध्ये असे स्टंट केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण असा स्टंट कोणी आपल्या लग्नात करेल अशी कोणी कधी कल्पनाही केली नसेल.सोशल मीडियावर प्रसिद्धी लोक काय करतील याचा नेम नाही. सध्या आगीच्या ज्वाळांसह लग्नाची एंन्ट्री घेणाऱ्या नवरा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरा नवरी एका मैदानावर आहे आणि पाहून आसपास उभे आहे.
नवरऱ्याने सुट परिधान केला आहे तर नवरी पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. दोघेही आगीच्या ज्वाळांने वेढलेले दिसत आहे. दोघेही पेटत्या ज्वाळांसह लग्नाची एन्ट्री घेताना दिसत आहे. दोघेही पळतच पुढे निघून जातात. मागे एक व्यक्ती फायर एक्सटिंग्विशर घेऊन उभा आहे. दोघांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली असली तरी हा धोकादायक स्टंट जीव धोक्यात टाकणारा आहे.
अमेरिकेतील लग्नाच्या रिसेप्शन एन्ट्रीसाठी वधू आणि वराला स्वतःला पेटवून घेतल्याबद्दल ट्रोल करण्यात आले आहे. प्रोफेशनल स्टंट गॅबे जेसॉप आणि अम्बीर बाम्बीर हॉलिवूड चित्रपटांच्या सेटवर काम करत असताना एकमेकांना भेटले. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन स्टंटचा व्हिडिओ डीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रस पॉवेल यांनी टिकटॉकवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ २०२२मधील असून सध्या पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवविवाहित जोडप्याने संपूर्ण स्टंट शांतपणे केले आणि अखेरीस अशा ठिकाणी पोहोचले जिथे ते दोघे जमिनीवर गुडघे टेकले, दोन व्यक्तीनी अग्निशामक यंत्रांसह आग शमवली व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका व्यक्तीने दावा केला की, हे दोघे प्रोफेशनल स्ंटट करणारे आहेत ज्यांनी एकमेकांशी लग्न केले आहे. दुसऱ्या एका तरुणाने दावा केला की, ते त्याचे नातेवाईक आहेत. नवरा नवरी दोघेही स्टंट डबल म्हणून काम करतात. ते दोघेही सुखरुप आहेत. तसेच स्टंट कराना त्यांनी आगीच्या ज्वाळापासून वाचण्यासाठी हीट प्रॉक्टेक्टर वापरले होते. केसांसाठी बनावटी वीग वापरला होता त्यामुळे तिच्या केसांना आग लागली नाही.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.