वाकड(पुणे):- परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी प्रियकरावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडला आहे.याप्रकरणी मुळची कर्नाटक आणि सध्या रहाटणी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आदम खान मलंग खान पठाण (वय-29 रा. डी मार्ट जवळ, काळेवाडी, मुळ रा. सिरसम पो. पालम जि. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात प्रेमसंबंध आहेत. ते दोघे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आरोपी फिर्यादी यांना घरात राशन आणि घर खर्च देत नसल्याने त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. फिर्यादी यांनी घर खर्च व राशन बाबत विचारणा केल्यावर आरोपी भांडण करत होता. फिर्यादी यांनी रविवारी दुपारी आरोपीला राशन व घर खर्चासाठी घरी बोलावून घेतले.
आदम पठाण याने घरी येताना एका बाटलीत पेट्रोल घेऊन आला. फिर्यादी यांनी खर्चाबाबत विचारणा केली असता खान याने बॅगेतून पेट्रोलची बाटली काढली.दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना ‘आज तुझा विषयच संपवून टाकतो’, असे म्हणत महिलेच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले. त्यानंतर महिलेला पेटवून देऊन जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला घरात ओढून नेऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ