धरणगाव l प्रतिनिधी
धरणगाव :- अपंग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकणी पत्नीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान, संशयित आरोपी पत्नी पती प्रकाश सुर्यवंशी याला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली.
नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेत त्याला विहिरीत ढकलले. यात पती प्रकाश सुर्यवंशी याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. दरम्यान, या खुनाची कबुली स्वतः पत्नीने दिली. त्यानुसार धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास धरणगाव पो.स्टे.पोनि.उद्धव ढमाले हे करीत आहेत.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






