Viral Videi: रस्त्यावरून गाडी चालविताना असताना काळजी घेणे गरजेचे आहे. भरधाव रस्त्यावर स्टंट करताना तरूणींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या X अकाउंटवर शेअर केला आहे.या तरूणी विनाहेल्मेट स्कुटीवरून प्रवास करत होत्या. तसंच त्या बाजूने जाणाऱ्या बाईक रायडर्ससोबत स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय.भरधाव वेगात सुसाट धावत या तरूणी बाईक राईडर्ससोबत स्टंट करत होत्या. परंतु त्यांना हा स्टंट चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे.
भरधाव वेगामुळे त्यांचे स्कुटीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे त्यांची गाडी खाली पडली. वेगामुळे त्या दोघीही गाडीसह फरफटल्या गेल्या. हा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.आपण बघू शकतो, की व्हिडिओमध्ये दोन तरूणी मस्त मजेत आपल्या स्कुटीवरून जात आहे. पंछी बनु उडती रहू मस्त गगन में, अशी धून आपल्याला ऐकू येत आहे. एकतर त्या विनाहेल्मेट गाडी चालवत आहे. त्यांनी वाहतूकीच्या नियमांचं उल्लघंन केलं आहे. त्यानंतर भरधाव वेगात काही बाईक रायडर्स येतात.
या तरूणी आपल्या स्कुटीवर उभं राहत त्यांना हाय बाय करतात. स्टंटच्या नादात त्यांचा स्कुटीवरचा बॅलन्स बिघडतो अन् त्या खाली कोसळतात. उत्तराखंड पोलिसांनी हा तरूणींच्या अपघाताचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आपल्या गाडीवर स्टंट करून आपला जीव धोक्यात घालू नका. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घाला, असं आवाहन देखील उत्तराखंड पोलिसांनी केलंय. त्यांनी असं कॅप्शनच हा व्हिडिओ शेअर करताना दिलं आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे वाहन चालवताना वेग आणि सुरक्षितेची काळजी घेणं गरजेचं आहे.
हे पण वाचा
- महावितरणकडून धडक मोहीम,विज बिल कमी यामुळे मीटर चेकिंग मोहीम,७७ वीज ग्राहकांचे मीटर घेतले तपासणीसाठी ताब्यात.
- कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२० जानेवारी २०२५
- एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन.
- लग्नानंतर अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला लागली दृष्ट; पतीचा मृत्यू नंतर विरह सहन न झाल्याने तिसऱ्याच दिवशी पत्नीने संपविले जीवन.