परभणी : प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका युवतीसोबत तीर्थक्षेत्र आळंदीस जावून प्रेम विवाह केला होता. दोन-अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते.
मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास बोलावून घेतले होते. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव आवकाळे आणि त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती कळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, उपनिरीक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, आप्पाराव वराडे, अतूल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेवून लगेचच तपास सुरु केला.
त्यात आरोपी हे घरातीलच सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव आवकाळे आणि व्यंकटेश आवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाप आणि भावाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






