उज्जैन :- आजकाल माणूस भावनाशून्य होत असल्याची अनेक उदाहणं बघायला मिळत आहेत. लोक बेधडकपणे एकमेकांचा जीव घेत आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अशीच एक घटना घडली. प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बडनगरमधील नयापूरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षांच्या अमित आचार्यने पत्नी शिखा हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन आपल्या हाताची नस कापली. यामुळे त्याचाही मृत्यू झाला. अमितच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. एक वर्ष सर्व काही व्यवस्थित होतं. मात्र, नंतर दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. या काळात दोघांना दोन मुलंही झाली. मोठा मुलगा लवित सात वर्षांचा आहे तर धाकटी मुलगी मैत्री दोन वर्षांची आहे.अमितची आई मंजू देवी यांनी आरोप केला आहे की, शिखा अमितचा मानसिक छळ करत होती.
यामुळेच अमित जास्त वेळ झाबुआ येथे राहत असे. झाबुआ येथे अमितचं वडिलोपार्जित घर आहे. अमितचे आई-वडीलही तिथे राहतात. शिखाशी भांडण झाल्यानंतर अमित काही दिवसांपूर्वी झाबुआ येथे आला होता. आईने समजवल्यावर तो आईसह नयापूरला आला. मंजू देवी यांनी सांगितलं की, मंगळवारी सकाळी नातू लवित आरडाओरडा करत त्यांच्याकडे धावत आला. आपले आई-वडील प्रतिसाद देत नसल्याची माहिती त्याने आजीला दिली. मंजू देवी धावत वरच्या मजल्यावरील खोलीत गेल्या तेव्हा सून आणि मुलगा दोघेही मृत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
जवळच एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात लिहिलं होतं की, माझी पत्नी शिखा आचार्य हिने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन कठीण करून ठेवलं आहे. घरात रोज भांडणं होतात, त्यामुळे माझा मानसिक छळ होत आहे. मी आणि आईने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली; पण मदत मिळाली नाही. आता मी खूप त्रस्त आहे. त्यामुळेच मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे. लवितने दिलेल्या माहितीनुसार, अमित रात्री बराच वेळ घरातील देवघरात पूजा करत होता. लवित रात्री आपल्या आजीसोबत झोपला होता. सकाळी आई-वडिलांना बोलावण्यासाठी तो घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा त्याला हा सर्व प्रकार दिसला. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.