पिंपरी : देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टेअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पाच जणांकडून तब्बल ४१ लाख रुपये घेऊन पतीपत्नीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विजय दत्तु महाडिक (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीष नागेश डोईफोडे व पूजा मनीष डोईफोडे या पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, देहुरोड येथे सुभश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. डॉ. मनीष डोईफोडे हे त्याचे चालक आहेत. त्यांनी फिर्यादी व सतीश महाजन यांना सांगितले की, हे हॉस्पिटल ३६ बेडचे आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत व मेन रोडपासून जवळ असल्याने खूप बिझनेस होणार आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सुभश्री हॉस्पिटल येथे मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
तसेच शुभम बाबुराव हरणे यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी ११ लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे रोहन संतोष निंबळे यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी ६ लाख, प्रविण रोशन नवले यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी १० लाख आणि सिद्धार्थ संजय बरळ
यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये घेऊन एकूण ४१ लाख रुपये घेऊन पाच जणांची फसवणूक केली.पोलीस उपनिरीक्षक सोळंके तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.