Viral Video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेले असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पण बिहार येथील एका तरुणीने देशभरातील तरुणींना नवा आदर्श घडवून दिला आहे. एका तरुणाला मुलीसोबत फ्लर्ट करणे चांगलेच महागात पडले आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या तरुणीच्या धाडसाचं कौतुक कराल. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्सही व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…या मुलीला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनवायला हवी. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… बीट इट हार्ड. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… अशा लोकांसाठी हा एकमेव उपचार आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ