‘जम्मूमध्ये सापडलेला दहशतवादी भाजपचा माजी IT सेल प्रभारी’

Spread the love

.’जम्मूमध्ये सापडलेला दहशतवादी निघाला भाजपचा माजी IT सेल प्रभारी’

रविवारी सकाळी तालिब हुसैन शाह आणि त्याच्या साथीदारांना रहिवाशी भागातून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्यांच्याकडून एके-47, ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रास्त्रं जप्त केली.

अटक केलेला तालिब हा कधीकाळी भाजपशी संबंधित होता, याबाबत भाजपचे प्रवक्ते आर. एस. पाठानिया म्हणाले की, “ऑनलाईन सदस्यता घेण्याचा हाच फटका आहे. कारण कुठलीही पार्श्वभूमी न तपासता तुम्ही सदस्यत्व देऊन टाकता.”


दरम्यान, कुठलाही मोठा घातपात करण्याआधीच जम्मू पोलिसांनी तालिब आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.


टीम झुंजार