भंडारा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पळवून नेणाऱ्या युवकाला २० वर्षाची शिक्षा झाली आहे. भंडारा अतिरीक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधिश पी. बी. तिजारे (स्पेशल जज पोक्सो) यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव सुभाष देवनाथ भोवते (२५, कलेवाडी ता. पवनी) असे असून २०२१ मधील हे प्रकरण आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही पळवून नेल्याचा आरोप सिध्द झाल्याने त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२३ सप्टेबर २०२१ रोजी एका बारावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी घरून सायकलीने शाळेत गेल्यावर परत आली नव्हती. त्यामुळे पालकांनी शोध घेतला असता, पहेला येथे एका पानठेल्याजवळ सायकल ठेऊन ती बसने अड्याळला गेल्याचे कळले. यामुळे २६ सप्टेबर २०२१ रोजी पालकांनी अड्याळ पोलिसात तक्रार केली होती. यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ती पोलिसांना सापडली. अल्पवयीन असल्याची कल्पना असली तरी प्रेमसंबंधातून पळवून नेल्याची कबुली आरोपीने पोलिसांत दिली होती.

या प्रकरणी न्यायलयाने पुराव्यांच्या आधारावर सुभाषला कलम सेक्शन ६ पोक्सो कायदा-२०१२ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास, ३ हजार रुपये द्रव्यदंड व न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर, कलम सेक्शन ४ पोक्सो कायदा २०१२ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्यदंड तसेच न भरल्यास २ महिने साधा कारावास, तसेच कलम ३६३ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास ५०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
हे देखील वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…