Diet tips For Acidity : आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास ॲसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते.
अॅसिडीटी ही अनेकांना सातत्याने उद्भवणारी समस्या. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. न पचलेले अन्न शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. कधी सतत येणारे ढेकर तर कधी गॅसेस आपला पिच्छा पुरवतात. कधी भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी अॅसिडीटी होते. काही वेळा झोप झाली नाही किंवा रुटीनमध्ये काही बदल झाला तर त्याचा परीणाम लगेचच आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणात अॅसिडीटी होते. कधी काही घरगुती उपाय करुन तर कधी आपल्याला माहित असलेली औषधे घेऊन यावर आराम मिळवला जातो. इतकेच नाही तर पचनाच्या तक्रारी जास्त झाल्या तर डॉक्टरांकडे जाऊनही औषधे घेतली जातात. मात्र आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास अॅसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते.
मुळात आयुर्वेदानुसार अॅसिडीटीचे दोन प्रकार केले जातात पहिला प्रकार म्हणजे अन्न पचत नाही म्हणजे बाईल मधली अॅसिड लेवल कमी होते त्याच्यामुळे अन्न पोटामध्ये पडून राहतं त्याला आंबूस वास येतो आणि मग सकाळी आपण उलटीद्वारे ते बाहेर काढतो. या प्रकारामध्ये पित्तातील कफाचे प्रमाण वाढते. अशावेळी गरम पाणी पिल्याने, तिखट पदार्थ खाल्ल्याने किंवा उलटी केल्यानंतर बरं वाटतं. दुसऱ्या प्रकारात सतत पोट रिकामा राहणं, टेन्शन घेणे, सतत तणावात असणे, उष्णते जवळ काम करणं, उन्हात काम करणं यामुळे पित्तातील उष्ण गुण किंवा दाहकता वाढते आणि मग उलटी,मळमळ, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात.
उपाय काय?

थंड पदार्थ, थंड गुणाची औषध घेणे लाभदायक ठरते. यामध्ये शतावरी, तुळशीचे बी, सब्जा बी होतो. गार दूध घेतल्यास त्यानेही फायदा होतो. गार पाणी वेळेवर जेवण करावे लागते जेवणात तिखट पदार्थ खाऊ नये, मिरची, मसालेदार पदार्थ खाऊ नये किंवा अर्धपोटी जेवण करावं आणि पुन्हा भूक लागल्यानंतर पुन्हा थोडं काहीतरी खावं असे सोपे घरगुती उपाय केले असता अॅसिडिटी नियंत्रणात राहते किंवा बरी होते. साधारणपणे मटकी, तूर डाळ, वाटाणे, मेथी, शेपू, यांनी अॅसिडीटी वाढते. हे पदार्थ तूप घालून खाल्ल्यास अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते. यासाठी सकाळी शतावरी चूर्ण आणि दूध सकाळी उठल्यावर घेतल्यास फायदा होतो.
हे वाचलंत का ?
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…