चाळीसगाव,(प्रतिनिधी) :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच अंत्यंत संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या गुंजन या चिमुकलीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. अंगावर शहारे आणणारी ही घटना पिंप्री प्र.दे. ता. चाळीसगाव येथील इंदिरानगर भागात मंगळवारी रात्री घडली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अरविंद कैलास पाटील (४०) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना मंगळवारी रात्री घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना ?
प्राप्त माहिती नुसार गावातील अरविंद पाटील हा कोयता घेऊन रात्रीच्या सुमारास घरात शिरला. महिलेस त्याने कोयत्याचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. नंतर घरातील बिर्याणी खाल्ली व नंतर विवाहितेवर कोयता उगारून खिशातील रुमालाने दोन महिन्यांची बालिका गुंजन सोनू ठाकरे हिचे नाक व तोंड दाबले. त्यातच याचिमुकलीचा मृत्यू झाला.
अरविंद कैलास पाटील (४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंप्री प्र. दे. येथील शोभना सोनू ठाकरे (२७) ही पती, मुलांसह वास्तव्यास आहे. पती सोनू ठाकरे हा मोजमजुरी करतो. याबाबत विवाहितेने पतीला या घटनेची माहिती दिल्यानंतर संशयिताचा पाठलाग करण्यात आला. मात्र, तो तत्पूर्वीच पसार झाला. मेहुणबारे पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.