ठाणे :- स्टेशन रोड परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ठाणे स्टेशन रोड परिसरात शाळकरी मुलगी रिक्षातून उतरली. पण नंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून तसंच तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेल असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. तर सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री शिंदेजी त्या रिक्षावाल्याला बेड्या ठोका अशी मागणी करण्यात येत आहे.
पहा व्हिडिओ :
नेमकं काय घडलं ?
ठाणे स्टेशन रोड परिसरात शाळकरी मुलगी रिक्षातून उतरली. पण नंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून तसंच तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर शाळकरी मुलगी रस्त्यावर खाली पडली. या सर्व प्रकारात शाळकरी मुलीला दुखापत झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झालं आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी रिक्षाचालकाचा तपास सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे.
कसे पकडले ?
सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचा नंबर दिसत नव्हता. पण मागे स्टीलचे गार्ड वगैरे लावले होते. असे गार्ड नवी मुंबई भागात लावलेले दिसतात. आरोपी थोडा जाड आणि चोटी ठेवणारा आहे अशी माहिती मुलीने दिली होती. त्यावरून राजू नावाचा असा रिक्षा चालक आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी दिघा भागात सर्व पार्किंग रिक्षा शोधायला सुरुवात केली. रात्रभर शोध सुरू होता. तेव्हा दिघा भागात अशीच एक गार्डची रिक्षा सापडली. तेव्हा ती रिक्षा पण राजूची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मग त्याच परिसरात शोध सुरू केला. तेव्हा त्याच्या घरी राजू सापडला, त्याने ताबडतोब कबूल केले की माझी चूक झाली. तसंच लोक मारतील म्हणून पळून गेलो. काल कळव्यातून भाडे घेतले, स्टेशनला भाडे सोडले. तिकडे एक इडली वाला आहे त्याकडे तो थांबलेला, तेव्हा त्याने या मुलीला पाहिले आणि छेड काढली, आणि पुढची घटना घडली, असंही सांगितलं.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.