भंडारा : – सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता भंडारा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांचीही गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.
आज सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.