भोपाळ : – सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीचा वाद झाला. या भांडणात शेजाऱ्याचा जीव गेला. मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पती-पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीला मारत होता. ती वाचवा वाचवा ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावला. त्यानं वाद सोडवला आणि मग घरी परतला. मात्र थोड्या वेळानं पती त्याच्या घरात काठी घेऊन शिरला. त्यानं केलेल्या हल्ल्यात शेजाऱ्याच्या डोक्याला इजा झाली. थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला. आरोपी पती फरार झाला.
पप्पू असं आरोपीचं नाव आहे. पप्पूची पत्नी कुंती बाईनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आला. आरोपीच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी पप्पूला अटक करण्यात आली. मी मंगळवारी घरात मटण तयार करत होतो. मात्र पत्नीनं विरोध केला. त्यामुळे वाद झाल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.
आरोपीच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील चतुर्वेदी यांनी दिली. पप्पू मजुरी करतो. मंगळवारी मटण तयार करण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडवायला आलेल्या बल्लूला पप्पूनं मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






