Rohit Sharma Emotional IND vs PAK : मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. त्याचवेळी कर्णधार रोहित भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहित कसेतरी आपल्या भावनांवर आवर घालताना दिसला.
पहा व्हिडिओ :
हा सामना जिंकून दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. युझवेंद्र चहल या सामन्यात खेळत नाही. हर्षल पटेललाही संघात ठेवण्यात आलेले नाही.
आतापर्यंत खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पॉवरप्ले संपला आहे. पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानने दोन गडी गमावून 32 धावा केल्या. अर्शदीप सिंगने भारताला दोन यश मिळवून दिले. त्याने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरला खातेही उघडता आले नाही, तर रिझवानला केवळ चार धावा करता आल्या.
भारत :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान :
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.