एरंडोल :- सध्या महाराष्ट्रात नवविवाहित महिलांचे शारीरीक व मानसिक छळ होण्याची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेण्याकरिता माहेरून दोन लाख रुपये आणावे ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे रवंजे खुर्द येथील माहेरवाशिणीचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सुनिता दीपक कोळी वय २७ वर्षे या महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींमध्ये दीपक सुभाष कोळी ( पती ), सुनंदा सुभाष कोळी ( सासू ) रा. साळवा ता. धरणगाव, मंगला मोहन बाविस्कर ( नणंद )रा. बोरगावले ता. चोपडा, आशा शरद सपकाळे ( नणंद ) ह. मु. मुंबई यांचा समावेश आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व पंकज पाटील, मिलिंद कुमावत, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहे.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.