घटनेच्या वेळी तिघीही रिजनल पार्क रोडवर फिरत होत्या. या अल्पवयीन मुलींनी विष प्राशन केल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विष प्राशन करण्याचे कारण शोधून काढले.
इंदूर:
इंदूरमध्ये तीन अल्पवयीन मैत्रिणींनी सल्फासच्या गोळ्या घेतल्या. यामध्ये दोन मुलींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आता शनिवारी सकाळी तिसऱ्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रादेशिक उद्यानाचे आहे. घटनेच्या वेळी तिघीही रिजनल पार्क रोडवर फिरत होत्या. या अल्पवयीन मुलींनी विष प्राशन केल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विष प्राशन करण्याचे कारण शोधून काढले.
अतिरिक्त डीसीपी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, तिन्ही मुली मूळच्या आष्टा (जि. सिहोर) जवळच्या ग्रामीण भागातील आहेत. या प्रकरणाची चौकशी केली असता या तिघींपैकी १६ वर्षीय मुलगी प्रियकर बोलत नसल्याने नाराज होती, तर दुसरी अल्पवयीन मुलगी हीघरगुती वादामुळे दु:खी होती, तर तिसरी मैत्रीण ही दोन्ही जिवलग मैत्रिणींना अडचणीत पाहून अस्वस्थ होती. त्यामुळे या तिघींनीही सल्फासच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर उद्यानात उपस्थित लोकांनी तातडीने मुलींना रुग्णालयात दाखल केलं.
मात्र, यादरम्यान दोन मैत्रिणींचा मृत्यू झाला, तर तिसऱ्या मैत्रिणीची प्रकृती चिंताजनक होती. शनिवारी तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.पोलीस सध्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. जेणेकरून या प्रकरणाची आणखी काही माहिती मिळू शकेल. अतिरिक्त डीसीपी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, तिसऱ्या अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच तिचा जबाब नोंदवण्यात येईल. त्याचबरोबर मुलींच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.