जामनेर : – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना अश्यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिस्किट पुडा देण्याचा बहाणा करून ७ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात ७ वर्षीय चिमुकला हा आपल्या आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता हा चिमुकला घरी एकटा असताना बाजूला राहणारा सुरेश शांताराम भोई याने त्याला जवळ बोलून बिस्कीट पुडा घेण्याचा बहाणा करून त्याला त्याच्या घरात नेले. घराचे दरावाजे बंद करून चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित चिमुकल्याने आपल्या सोबत घडलेले प्रकार नातेवाईकांना सांगितला. संतप्त नातेवाईकांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी सुरेश शांताराम भोई यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






