प्रतिनिधी l पारोळा,एरंडोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना हे पक्षाचे नाव देण्याचा एतेहासिक निकाल दिल्याचा पार्श्वभूमीवर आमदार चिमणराव पाटील यांच्या गटाकडून पारोळ्यात डीजे लावून एकच जल्लोष करण्यात आला. सायंकाळी हा निकाल येताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांनी काजगाव रोड वरील पेट्रोल पंप जवळ डीजे लावून व फटाक्यांची आतिषबाजी करून शेकडो शिवसैनिकांचा उपस्थित आपला आनंद व्यक्त करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या दरम्यान पंपा पासून डीजे सह श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा पर्यत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.माजी सभापती अमोल पाटील यांनी यावेळी श्री शिवाजी महाराज यांना माल्यार्पण केले.
यावेळी एरंडोल चे शालीकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सामाजीक कार्यकर्ते आंनदा चौधरी भगत संजय चौधरी,मयूर महाजन,गोविंद बिर्ला, पारोळा शिवसेना ता प्रमुख मधुकर पाटील, बबलू पाटील, विलास वाघ, विकास पाटील, राजू कासार, विजय निकम, बी एन पाटील, सिद्धार्थ जावळे सह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्दल एरंडोल शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष विजय उत्सव साजरा केला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील जिल्हा बँक संचालक अमोलदादा चिमणराव पाटील
यांच्या मार्गदर्शनात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच ढोल ताशाच्या गजरात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेका धरला एकमेकांना पेढे भरवण्यात आले तसेच विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले .तसेच रस्त्याने वाजंत्री सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेका धरला व आनंदोत्सव साजरा केला .


बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी ,तालुका प्रमुख रवींद्र जाधव, शहर प्रमुख आनंदा चौधरी भगत ,तालुका संघटक संभाजी पाटील ,माजी नगरसेवक मेघराज महाजन ,संजय चौधरी, जावेद मुजावर, मयूर महाजन , कृष्णा ओतारी, गुड्डू जोहरी, गोविंदा बिर्ला ,प्रवराज पाटील ,शंतनू भेलसेकर ,संजय पाटील ,कादर पिंजारी विजय जाधव,शिवाजी पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.