नाशिक : – मौज मजा, सुख चैनीसाठी मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला (Nashik) नाशिकच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडून (Theft) चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हे संशयित हे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोबाईल खेचून जबरी लूटीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना लक्षात घेता नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ आणी महेश साळुंखे यांनी तांत्रिक विश्लेषण करून सिडको येथील शांतीनगर भागात राहणार संशयित चेतन निंबा पवार, पौर्णिमा बस स्टॉप परिसरात राहणारा संशयीत शशिकांत सुरेश अंभोरे, जुने सिडको परिसरात राहणार विजय सुरेश श्रीवास्तव या संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसुन चौकशी केली.
२२ मोबाईल जप्त :
चोरट्यांकडून शहर परिसरातून चोरलेले एकूण २२ मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आडगाव २, सातपूर २, मुंबई नाका १ आणि सरकारवाडा पोलीस ठाणे १ अश्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. मौज मजा करन्यासाठी हे संशयित मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.