एरंडोल l प्रतिनिधी – शहरात दिनांक 20 फेब्रुवारी रोजी एकाने आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी ने गळफास लावून आत्महत्या केली
या बाबत माहिती अशी की शहरातील 40 वर्षीय युवकाने दि.२० फेब्रू.रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जहांगीर पुरा भागातील रहिवासी सुभाष रामा महाजन ( वय ४० ) याने पत्नी शेतात गेलेली असतांना व मुल क्लास ला गेली असताना घरी कोणी नसताना आपल्या राहत्या घराच्या छतावरील पंख्याला साडीने गुंडाळून आत्महत्या केली
याच क्षणी घरी सुभाष यांचा मुलगा शाम आला असता त्याने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत बघितल्यावर शेजारी राहणारे आपले मामा पुंडलिक महाजन आवाज देऊन सांगितले.पुंडलिक महाजन यांनी शेजाऱ्यांच्या व इतर नागरिकांच्या सहकार्याने सुभाष यांना खाली उतरवले व जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.


सुभाष हा बांधकाम मजूर होता.त्याच्या पश्चात पत्नी,दोन जुळे मुल,आई,दोन भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे.पुंडलिक महाजन यांच्या फिर्यादी नुसार एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल पाटील हे करीत आहेत.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.