मुंबई :- गाडी क्रमांक ०१४६० विशेष मडगाव येथून २७ फेब्रुवारी ते १३ मार्चपर्यंत दर सोमवारी ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी असे थांबे देण्यात आले आहे. पुणे – करमळी साप्ताहिक विशेष ६ सेवा धावणार असून यामध्ये गाडी क्रमांक ०१४४५ विशेष २४ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१४४६ विशेष गाडी २६ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत दर रविवारी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
या गाड्यांना लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. पनवेल- करमळी साप्ताहिक विशेष ८ सेवा धावणार असून, गाडी क्रमांक ०१४४७ साप्ताहिक विशेष गाडी २५ फेब्रुवारी १८ मार्चपर्यंत दर शनिवारी रात्री १० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४८ गाडी २५ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत दर शनिवारी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

या गाडयांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांच्या ४ सेवा असणार आहेत. पुणे- दानापूर साप्ताहिक होळी विशेष २ सेवा देण्यात आल्या आहेत. पुणे ते अजनी दरम्यान देखील ६ सेवा घोषित करण्यात आल्या आहेत.

कोकणासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव साप्ताहिक विशेष ६ सेवा धावणार असून, यामध्ये गाडी क्रमांक ०१४५९ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत दर रविवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






