बरेली :- उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका मुस्लिम तरुणीने हिंदू धर्म स्वीकारून तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. बरेलीच्या देवर्निया पोलीस स्टेशन परिसरात राहणारी सायमाने प्रियकर शरदशी लग्न आणि हिंदू धर्म स्वीकारला.त्यांनी आता आपले नाव शालिनी केले आहे. किल्ला परिसरातील अगस्त्य मुनी आश्रमात गुरुवारी सायंकाळी महंत केके शंखधर यांच्या हस्ते दोघांचा विवाह झाला.
लग्नापूर्वी देवर्निया पोलीस ठाण्याच्या राहपुरा गनीमत गावात राहणारी सायमा उर्फ शालिनी आणि तिचा प्रियकर शरद उर्फ विपिन कुमार यांनी त्यांच्या संमतीने लग्नाचे प्रतिज्ञापत्र दाखवले. महंत के.के.शंखधर यांनी सायमा यांचे धर्मांतर केले आणि त्यानंतर त्यांनी लग्न लावून दिले.
दोघांचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते :–
दोघांची घरे गावात जवळच असल्याचे प्रेमी युगुलाने सांगितले की ते एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि त्यांना लग्न करायचे होते.पण दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. सायमाने सांगितले की तिची हिंदू धर्मावर आधीपासूनच श्रद्धा आहे. त्यामुळे आता तिहेरी तलाकची भीती मनात राहणार नाही.
सायमा उर्फ शालिनीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बरेली पोलिस-प्रशासनाकडे तिला आणि तिच्या पतीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
त्यांच्यासोबत काही वाईट घटना घडल्यास त्याला वडील आणि भाऊ जबाबदार असतील. शालिनीने सांगितले की आयुष्यभर हिंदू म्हणून पतीसोबत राहणार आहे.
हे देखील वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…