बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वाधिक न्याय मिळवून देणार – माजी मंत्री डॉ.सतीश पाटील

Spread the love


प्रतिनिधी l पारोळा
शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्माण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिता कडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु यापुढे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या हितार्थ सर्व निर्णय घेऊन त्यांना जास्तीत जास्त न्याय कसा दिला जाईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी सभापती पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर उपस्थित समोर केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापती पदाची आज दुपारी बारा वाजता निवड करण्यात आली. त्यात माजी मंत्री डॉ सतीश पाटील ची सभापती तर उपसभापती पदी सुधाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सह्ययक निबंधक पी एच भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत संचालक बैठक झाली . कै भास्करराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ व न्याय देण्यासाठी तत्कालीन वेळेस आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन हजार समितिची स्थापना केली होती. त्यांचा तो दृष्टिकोन लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्ती जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळावा म्हणून मागेल त्या व्यापाऱ्याला परवाना देण्याचे मी धोरण ठेवणार आहे.तसेच आठवड्यातून तीन दिवस बाजार समितीला देऊन शेतकरी अडीअडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प दरात भोजन व निवास व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इतर संचालकांनी देखील बाजार समितीला आपला वेळ देण्याचा आग्रह त्यांनी यावेळी केला. आ चिमणराव पाटील, अमोल पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली.

तर डॉ हर्षल माने म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समिती काही चुकीचे प्रकार होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.तो प्रकार यापुढे थांबून अधिकाधिक न्याय देण्याची भूमिका आमचे संचालक मंडळ करेल असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी विविध संचालक कार्यकर्ते यांनी सभापती उपसभापती यांचे स्वागत सत्कार करून सत्कार केला.

हे पण वाचा

टीम झुंजार