एरंडोल :- चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये कायम वाद होत असल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीस मारहाण करून डोक्यात कुऱ्हाड व फरशी मारून खून केल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील गांधीपुरा भागात घडली.पोलिसांनी संशयित पतीस अटक केली असून पती,पत्नीच्या वादात आईचा मृत्यू झाला असून पोलिसांनी वडिलांना अटक केल्यामुळे त्यांची दोन अल्पवयीन बालके अनाथ झाली आहेत.दरम्यान खुनाची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी,की शहरातील गांधीपुरा भागातील होळी मैदान परिसरातील रहिवासी किरण महादू मराठे (वय-३५) व त्याची पत्नी हर्षदा किरण मराठे (वय-२७) या पती पत्नी मध्ये वाद,मागील महिन्यात पत्नी हर्षदा ही बारा दिवस घरातून बेपत्ता झाली होती तसेच पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून कायम वाद होत होते.किरण मराठे खासगी कंपनीत काम करून परिवाराचा चरितार्थ चालवत होता.
रात्र पासून आज सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.पती पत्नी मध्ये झटापटी झाली, दोघांमध्ये हाणामारी झाली पत्नी हर्षदाने किरण याच्या हातातील बोटाना जोरात चावा घेतला तसेच त्याच्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून संतप्त झालेल्या किरण मराठे याने पत्नी हर्षदा हिस मारहाण करून डोक्यावर कुऱ्हाड मारून फरशीने जोरदार प्रहार केला.डोक्यात कुऱ्हाडचा वार व फरशी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे हर्षदा मराठे हि जागीच ठार झाली. संशयित आरोपी किरण महादू मराठे हा पोलीस स्टेशनला हजर झाला
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेवून हर्षदा हिस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिका-यांनी हर्षदा मयत झाल्याचे सांगितले.किरण मराठे आणि हर्षदा मराठे यांच्यात यापूर्वी देखील दोन ते तीन दिवस वाद झाला होता.पोलिसांनी दोघांमध्ये समझौता केल्यामुळे ते पुन्हा एकत्र राहत होते.हर्षदा मराठे हिचे वागणे बरोबर नसल्यामुळे पती पत्नीमध्ये कायम वाड होत होते.मयत हर्षदा मराठे हिने घटस्फोटासाठी अर्ज केला केला होता.
पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा हिस अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता,मात्र तिच्या वागण्यात कोणताही बदल होत नव्हता.मयत हर्षदा हिच्या वागण्याबाबत परिसरात अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहे.किरण मराठे व हर्षदा मराठे यांना नऊ वर्षाची मुलगी व सहा वर्षाचा मुलगा आहे.चारित्र्याच्या संशयावरून आईवडिलांच्या भांडणात दोन अल्पवयीन बालके अनाथ झाल्याची प्रतिक्रिया परिसरात व्यक्त केली जात आहे.मयत हर्षदाचे माहेर नंदुरबार येथील असून रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थांनकात संशयित आरोपी किरण मराठे याच्या विरोधात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संशयितआरोपीस २ दिवसाची पोलिस कोठडी दि.१९/६/२०२३ सकाळी ११ वाजेचे सुमारास जुन्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी व कुर्हाड टाकून खून केल्या प्रकरणी एरंडोल न्यायालयाने सरकारी पक्षाचा व आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून किरण मराठे यास २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आरोपिता तर्फे ज्येष्ठ विधीज्ञ रमेश माधवराव दाभाडे हे कामकाज पाहत आहेत..
हे पण वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…