पारोळा :- पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पारोळा पोलीस स्टेशन यांचे कडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
1) सध्या पेरणी व शेती मशागतीचे दिवस असलेने शेतकरी घर बंद करून शेतात जातात परंतु घराची चाबी घरासमोरील चप्पलखाली, विटे खाली, जीण्याखाली,दराचे वर,बाथरूम मध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवतात व त्या ठिकाणावरूनच चोरटे, चाबी शोधून घर उघडुन चोरी करतात
2) बरेच वेळा कपाटावर तसेच कपाटातील साडीमध्ये किंवा कपड्यात, कपाटातील लॉकरची चाबी ठेवतात अशा चुकीमुळे चोरट्यांना चोरी करणे सोपे जाते
3)शेतात गेलेवर घरी कोणीतरी थांबले पाहिजे,घरातील दागदागिने,पैसा बैंकेत लॉकर मध्ये ठेवले पाहिजे
4)गावात कोणताही फेरीवाला कोणतीही वस्तू विकण्यास आल्यास त्याला पोलीस पाटील यांचे मुसाफिर रजिस्टरला नोंद करण्यास सांगणे,पोलीस पाटील यांनी त्या मुसाफिरचा फोटो व आधारकार्ड घ्यावे, मुसाफीर रजिस्टरला नोंद घेणे.
5)गावात जर कोणी संशईत दिसून आल्यास त्याचा व मोटर सायकल चा फोटो तात्काळ काढावा, पोलिसांचाच आदेश आहे म्हणून सांगावे
6) आपआपले गावात CCTV बसविणे कामी प्रत्येकाने पुढाकार घेऊन,गावात येणारे,जाणारे रोड व प्रमुख चौक कव्हर होईल असा सर्वे करून लोकवर्गणी चे माध्यमातून बसवावे.
7) सरपंच, सदस्य,ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत चे मासिक मीटिंग मध्ये 15 वे वित्त आयोगातून CCTV करीता ठरावाद्वारे मंजुरीचा ठराव घ्यावा, व तसे प्रकरण मंजुरीस पाठवावे,
8)शक्यतो शेतातील किंवा ज्या ठिकाणी जनावरे बांधतात त्या ठिकाणी मुक्कामी थांबावे,जनावरे चोरी होण्याच्या घटना होत असलेले सतर्कता बाळगणे जरूरीचे आहे
9)गावातील सर्व ग्राम सुरक्षा दल सदस्य यांनी पोलीस पाटील यांचे नियमित संपर्कात राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास सहकार्य करावे.
10)CCTV हे 24 तास डोळे उघडे ठेवणारे यंत्र आहे त्यामुळे सर्वांनी हिरीरीने भाग घेऊन वर्गणी गावचे पोलीस पाटील यांचेकडे जमा करावी,CCTV बसविणारे ऑपरेटर श्री काटे अमळनेर मोबाईल न 9960859521
यांचेशी संपर्क करून सर्वे करून CCTV बसऊन घ्यावे.
वरील मेसेज गावातील इतर ग्रुप वर टाकावे व वरील सूचनांचे पालन करावे.सर्वांनी गावचे पोलीस पाटील यांना वर्गणीस सहकार्य करावे असे आवाहन रामदास वाकोडे पोलीस निरीक्षक पारोळा पो स्टे यांचे जाऊन करण्यात आले आहे.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..