कोल्हापूर :- लग्नाचे आमिष दाखवून पोलीस महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडलीय. याप्रकरणी पीडित महिलेनं विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस दलातील वसीम शब्बीर ऐनापुरे (वय 35) आणि त्याचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघे रा.संजनयनगर, सांगली) या दोघांवर गुन्हा नोंद झालाय.
पोलिस कर्मचारी वसीमला पोलिसांनी अटक केलीय. पीडित महिला ही सांगली पोलिस दलात नोकरीला आहे. सांगली पोलिस बँड पथकातील वसीम ऐनापुरे याच्यासोबत पीडितेची ओळख झाली. या ओळखीतून वसीम ने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दि. 4 मार्चपासून दि. 6 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायक नगर येथे नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला.
यामध्ये पीडित पोलिस महिला गर्भवती राहिली. पीडित गर्भवती असल्याचं समजल्यानंतर संशयित वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीनं गोळ्या खायला घातल्या. तसेच यासाठी वसीमच्या वडिलांनी तक्रार करू नये म्हणून पीडितेच्या भावाला फोनवरून धमकावलं. याबाबतची तक्रार पिडीत महिलेनं विश्रामबाग पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी वसीमला पोलिसांनी अटक केलीय.
हे पण वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…