मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रध्येय दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाचा ६८ वा वर्धापनदिन सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर येथे २५ जुलै २०२३ रोजी मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माथाडी कामगार नेते आणि अध्यक्ष – आण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ (कॅबिनेट मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढूमणे, बँकिंग क्षेत्राचे प्रभारी रामनाथ केणी, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या शर्मिलाताई पाटील, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मधुकर येवले, मुंबई अध्यक्ष बापू दडस, मुंबई सचिव संदीप कदम तसेच मुंबई जिल्हा भारतीय मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे भारतीय मजदूर संघ मुंबईच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी घरेलू कामगारांच्या दहावी बारावी पास झालेल्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले.
मुंबई इंटकचे माजी अध्यक्ष जनार्दन सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय मजदूर संघात जाहीर प्रवेश केल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह सत्कार करण्यात आला. पटना येथे झालेल्या एल-२० प्रोग्रामसाठी उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय मजदूर संघ मुंबईच्या उपाध्यक्ष पार्वती अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा सन २०२२/२३ चा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रसन्न पारकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आरसीएफ को-ऑप. सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय मजदूर संघाचे सदस्य प्रवीण गोंजी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू दडस यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष जनार्दन सिंग यांनी कामगारांची सद्यस्थिती बाबत विचार व्यक्त केले. शर्मिलाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनिल ढुमणे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. विवेक भटकर यांनी आभार प्रदर्शन केले. मुंबईत अतिवृष्टी असूनदेखील दादर येथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्य यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.