बीड :- मध्ये एका प्रेमी युगुलाचा धक्कादाय अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगुल लॉजवर गेले पण ते न परतण्यासाठीच. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही घटना घडली आहे.
कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बीडमधील वडवणी येथे राहणार नंदकुमार वांडेकर आपल्या प्रेयसीला घेऊन सिरसदेवी येथील शिवनेरी लॉजवर गेले. ते गावात एकमेकांच्या समोर राहत होते. येथे सोबतच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गोळ्या नेण्याचे कारण सांगून ते खाली आले आणि त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले.

दरम्यान आत्महत्या करण्याआधी नंदकुमार यांनी महिलेची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. शिवनेरी लॉजवर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचा तपास करत असताना नंदकुमारसोबत असल्याचे त्यांना कळाले यानंतर प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले. तेथे त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
नंदकुमार यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. लॉजवर दोघांचे भांडण झाले आणि वादातून नंदकुमार यांनी महिलेची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. महिलेची हत्या केल्यानंतर नंदकुमार खोलीला टाळे लावून बाहेर पडले. यानंतर लॉज मालकाला संशय आला. त्याने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






