किसान इस्तखार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीच पतीची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती.या प्रकरणात पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीनेच पतीची सुपारी दिल्याच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
खळबळजनक म्हणजे, पतीच्या मृत्यूआधी पत्नीनेच त्याला चहात नशेचे औषध टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर पत्नीच्या समोरच तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्राने रश्शीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून खून केला. तर, पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नीने प्रियकरांच्या मित्रांना एक लाख रुपये देण्याचा दावा केला होता. पोलिसांनी या प्रकरणात, आरोपी पत्नी, तिचा प्रियकर, प्रियकराचे दोन्ही भाऊयांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. घटनेत वापरण्यात आलेली कार व दोरीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी उमरपुर ते नांगल येथे जाणाऱ्या रस्त्यावर पतीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख जामिन अली अशी पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे कुटुंब शेती करुन आर्थिक गुजराण करतात. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता. या तपासाची कसून चौकशी सुरू केली होती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला त्यादिशेने तपास सुरू केला. तेव्हा जाकियाच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. तेव्हा सगळ्यांनी इस्तकारची हत्या केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या प्रियकराने सांगितले की, जाकियाच्या घराजवळच त्याच्या बहिणीचे घर होते. तो जेव्हा बहिणीच्या घरी जायचा तेव्हा त्याची तिच्यासोबतही ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर पतीला दोघांमधील अफेअरबाबत कळले. तेव्हा त्याने तिला मारहाणदेखील केली. या घटनेनंतर जाकियाने पतीची हत्या करण्याचे ठरवले. पतीच्या हत्येनंतर दोघंही आरामात राहतील असा विचार दोघांनी केला. 29 डिसेंबर रोजी जाकियाने घरी चहा बनवला आणि त्यात नशेचे औषध दिले. तो बेशुद्ध पडल्यानंतर दोरीने त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर इतर साथीदाराच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.