प्रेमविवाह आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची आणखी एक कहाणी समोर आली आहे, ज्याचा परिणाम भयावह ठरला. हीना मेहबूब (19) आणि तौफिक शौकत (24) यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी दोघेही भाड्याच्या कारमधून दर्ग्यात गेले होते.पण, त्यानंतर असे काही घडले की, नवविवाहित नवरी आपल्या पतीला सोडून चालकासह पळून गेली.वास्तविक, नवविवाहित जोडपे दर्ग्यात आनंद साजरा करण्यासाठी गेले होते.
दोघांनीही दर्ग्यात जाण्यासाठी कॅब घेतली होती. या छोट्या प्रवासात वधू गाडी चालकाच्या प्रेमात पडते. त्यानंतर काही दिवसांतच ही नववधु ड्रायव्हरसोबत पळून जाते. मात्र, हे प्रकरण इथेच संपले नाही. पत्नीच्या सुटकेमुळे पती तौफिक चांगलाच संतापला आणि त्याने बदला घेण्याचा कट रचला. त्यानंतर तौफिकने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला.
त्यानंतर तो एका फार्म हाऊसवर पोहोचला आणि तेथे त्याने यासीन आणि हिना या दोघांवर हल्ला केला. आरोपीने आधी पत्नीची हत्या केली त्यानंतर प्रियकर यासिनची हत्या केली. त्याचवेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासू आणि सासऱ्यावरही आरोपींनी हल्ला केला. खून केल्यानंतर तौफिकने घटनास्थळावरून पळ काढला. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. विशेष पथकामार्फत आरोपींचा शोध सुरू आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडलीय.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






