सबगव्हाण या पारोळा येथील टोल नाक्याच्या उद्घाटनाआधीच तोडफोड करून केली जाळपोळ, पहा सीसीटीव्ही व्हिडिओ

Spread the love

पारोळा :- तरसोद ते फागणे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गावर पारोळा शहरापासून काही अंतरावर सबगव्हाण खुर्द येथे टोल नाका सुरु करण्यात आला असून या तोल नाक्यावरील कॅबिन जाळून टाकण्याचा प्रकार घडला आहे.नागपूर- मुंबई महामार्गाचे तरसोद ते फागणे दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. काही भागातील काम पूर्ण झाले असून या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आला आहे. या मार्गावरील पाळधी ते तरसोद बायपासचे काम अद्याप बाकी आहे.

असे असताना पारोळ्याजवळ उभारण्यात आलेला हा (Toll Plaza) टोल नाका ११ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारे तोल नाका सुरु करणे चुकीचे असून टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नाहीत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पारोळा शहरापासून काही अंतरावरील सबगव्हाण खुर्द येथील टोल नाक्याचे काम अपूर्ण होते. काम पूर्ण झालेले नसतानाही तो ११ मार्चपासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते.रविवारी मध्यरात्री विनाक्रमांकाच्या मोटारीतून काही बुरखाधारी आले. त्यांनी टोल नाक्याचे कक्ष पेट्रोल टाकून पेटवून देत तोडफोड केली.

तेथील आणखी एका कक्षाचीही तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी पलायन केले. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे पाळधी ते तरसोद वळणरस्तादरम्यान, तसेच अनेक भागांचे काम अपूर्ण असताना टोल नाका सुरू करणे कितपत उचित आहे, असा प्रश्‍न वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. सबगव्हाण गावानजीकचा टोल नाका सुरू करण्यास पारोळा तालुक्यातील नागरिकांनीही विरोध केला आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना टोलनाक्यास विरोधासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार