.

बीड प्रतीनिधि :– येथून 385 किमी अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील कावड गावात सेल्फी कढण्याच्या नादात नवविवाहित जोडपे आणि त्यांचा मित्र असे एकूण तीन जण नदीत बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे…
ताहा शेख (20), तिचा पती सिद्दीक पठाण शेख (22) आणि त्यांचा मित्र शहाब अशी मृतांची नावे आहेत, या तिन्ही जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले, असे संबंधीत पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या दुर्देवी घटने बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तिघांचे मृतदेह ते जिथे बुडाले तेथून जवळच अंतरावर आढळून आले. नदीला सध्या फार पाणी नाही. पण तरीही एकमेकांना वाचवण्याच्या नादात हे तिघेही बुडाले आणि आपला प्राण गमावून बसले.