पारोळा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एरंडोल विधानसभेची महत्वपुर्ण बैठक पारोळा येथे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी एरंडोल व पारोळा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांची नोंदणी कशी करता येईल, यासाठी आढावा व उपाय योजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली. नोंदणीसाठी महिलांपर्यंत शासनाचे प्रतिनिधी कसे पोहचतील व पात्र महिला वंचित राहणार यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
तसेच पात्र महिलांना अर्ज भरतेवेळी उद्भवत असणाऱ्या अडचणी जाणुन त्या शासन दरबारी कळविण्याचा सुचना देखील यावेळी देण्यात आल्या यासमयी पारोळा तालुक्यातील २४,००० तर एरंडोल तालुक्यातील २०,००० पात्र महिलांचे प्राप्त अर्ज मंजुर करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कुणाल महाजन, सदस्य पंजाबराव पवार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजय पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे, एरंडोल गटविकास अधिकारी दादाजी जाधव, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय धनगर यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






