आणखी एका कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

Spread the love

चंदीगड – पतियाळातील पंजाब विद्यापीठासमोर एका कबड्डीपटूची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या कबड्डीपटूचे नाव आहे. गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची गेल्या महिन्यापासूनची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जालंधरमध्ये संदीप सिंह नानगल या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूचीही अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

धर्मेंद्र याच्या हत्ये प्रकरणातील चार संशयीत हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कॅनडातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचेही नाव समोर आले आहे. धर्मेंद्र सिंह हे दौन कालान गावच्या कबड्डी क्‍लबचा अध्यक्ष होता. त्याचा राजकारणातही सक्रीय सहभाग होता.

पंजाबमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी त्याने आम आदमी पक्षाचा प्रचार केला. दौन कालान आणि थेरी या गावातील गावकऱ्यांत भांडण सुरु झाले होते व त्यात धर्मेंद्र दोना गावातील गावकऱ्यांची बाजू घेत होता. त्याचवेळी अज्ञात इसमाने त्याच्यावर गोळीबार केला व तेथून पलायन केल

धर्मेंद्र याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे स्थानिक पोलीसांनी सांगितले आहे. या प्रकरणात गुन्हेगारी टोळीचाही हात असल्याचे समोर येत आहे. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

टीम झुंजार